ऊस तोडणी टोळी कशी बनवली जाते? टोळी मालक मुकादम कसे व्हावे? कारखाना करार 2026
ऊस तोडणी टोळी कशी बनवली जाते? टोळी मालक मुकादम कसे व्हावे? कारखाना करार 2026 उसतोड टोळी कशी बनवली जाते? मुकादम कसे व्हावे, कारखान्यासोबत करार कसा करावा, एडव्हान्स किती मिळतो, 10 ते 15 लाख कामगारांचा व्यवसाय अगदी सोप्या गावाकडच्या भाषेत समजून घेऊ. मित्रहो व्यवसाय कोणताही असो त्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. अन्यथा आपण आपले आर्थिक नुकसान करून घेत असतो हे मात्र नक्की. 10 ते 15 लाख लोकांचा व्यवसाय: महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने, 60,000 पेक्षा जास्त वाहन मालक, अंदाजे 55,000 मुकादम आणि जवळपास 10 ते 15 लाख लाख ऊसतोड कामगार या व्यवसायात आहेत. त्यापैकी काही कारखाने सहकारी तर काही private आहेत. शेतकर्यांनी ऊस तोडायचा नसतो, तो कारखाना मुकादमामार्फत तोडून आणतो. म्हणूनच टोळी मालकाला गावात मुकादम म्हणतात. हाच या व्यवसायाचा खरा मालक असतो. आनंदी शेतकरी यशस्वी टोळी 1. ऊसतोड टोळी कशी बनवली जाते? एक टोळी म्हणजे 1 ट्रॅक्टर + 1 ट्रॉली + 12 ते 16 लोकांची जोडी. एका जोडीत नवरा-बायको असतात. यालाच कोयता म्हणतात. 2. टोळी बनवण्यासाठी काय लागतं? - माणसं: बीड, धाराशिव, सांगोला...