TAIT परिक्षचे स्वरूप अभ्यासक्रम

TAIT परिक्षचे स्वरूप अभ्यासक्रम

TAIT परीक्षा महाराष्ट्र शासना मार्फत घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक भरती केली जाते. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. निगेटिव्ह गुण पद्धत नसते. परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम खालील प्रमाणे असते.

TAIT परीक्षा स्वरुप अभ्यासक्रम
TAIT परीक्षा अभ्यासक्रम 

  • TAIT परीक्षेचे स्वरुप अभ्यासक्रम : Syllabus, Cut Off, पात्रता आणि शिक्षक भरती संपूर्ण माहिती
  • TAIT परीक्षा 2026 - शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे.
  • TAIT म्हणजेच Teacher Aptitude and Intelligence Test. या परीक्षेशिवाय तुम्हाला Pavitra Portal वर शिक्षक भरतीसाठी अर्जच करता येणार नाही.

TAIT Exam साठी पात्रता काय आहे?

1. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2. Graduation + D.Ed किंवा B.Ed पूर्ण असणे गरजेचे आहे
3. TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक. (D.ed धारक)
4. वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे (sc,st 5 वर्ष सूट)

TAIT परीक्षा स्वरुप

  • TAIT मध्ये एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण असतात. वेळ 2 तास.
  • Aptitude Test (कल चाचणी) - 120 गुण: यात गणित, मराठी, इंग्रजी, तर्कशक्ती आणि व्यक्तिमत्व चाचणी असते.
  • Intelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी) - 80 गुण: यात आकलन, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, सहसंबंध हे विषय असतात.
  • Negative Marking नाही

TAIT अभ्यासक्रम 2026

अभियोग्यता - 120 प्रश्न आणि गुण 
1. मराठी भाषा - 15 15
2. इंग्रजी भाषा - 15 15
3. सामान्य ज्ञान - 30 30
4. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 30
5. अंकगणित / गणितीय क्षमता - 30 30

बुद्धिमत्ता - 80 प्रश्न

बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) - 80 गुण
सविस्तर अभ्यासक्रम

अभियोग्यता (Aptitude) - यात 8 उपघटक येतात:

1. गणितीय क्षमता: संख्यामाला, BODMAS, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा-तोटा, सरळव्याज चक्रवाढ व्याज
2. भाषिक क्षमता (मराठी): वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी / विरुद्धार्थी, म्हणी व वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तके-लेखक
3. भाषिक क्षमता (इंग्रजी): Grammar - Tense, Voice, Narration, Article, Synonyms, Antonyms, Spelling, Idioms & Phrases
4. वेग आणि अचूकता: पत्ते जुळवणे (Address Matching)
5. अवकाशीय क्षमता आकृत्या, आरशातील प्रतिमा
6. सामान्य ज्ञान:इयत्ता 8 ते 12 वी च्या क्रमिक पुस्तकांवर आधारित सामान्य ज्ञान
7. कल / आवड व समायोजन / व्यक्तिमत्व: शिक्षकाची आवड, छंद, परिस्थितीजन्य प्रश्न
8. बालमानसशास्त्र:पियाजे, कोहलबर्ग, वायगोत्स्की यांचे सिद्धांत, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी मुले

बुद्धिमत्ता (Intelligence) 

आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा (Coding-Decoding), लयबद्ध मांडणी, रक्तसंबंध, दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था, Puzzle, Syllogism, Inequality

TAIT साठी सर्वोत्तम पुस्तके व लेखक

एकत्रित तयारीसाठी (All-in-One):
1. MAHA TAIT संपूर्ण मार्गदर्शक - लेखक: अनुपम पाटील - Smart Study Publication - सर्वात जास्त विकले जाणारे पुस्तक
2. TAIT अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - लेखक: अंकुश शिंगाडे - दीपस्तंभ प्रकाशन
3. MAHA TAIT 120 + 80 पॅटर्न - नितीन महाले / साकेत प्रकाशन

विषयानुसार पुस्तके:
4. बुद्धिमत्ता चाचणी - लेखक: आर. एस. अग्रवाल (मराठी आवृत्ती) - बेसिक ते Advance Reasoning साठी बेस्ट
5. अंकगणित व गणितीय क्षमता - लेखक: पंढरीनाथ राणे किंवा आर. एस. अग्रवाल

6. मराठी व्याकरण - लेखक: बाळासाहेब शिंदे/ मो. रा. वाळिंबे
7.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- लेखक: दुनाखे सर / के'सागर प्रकाशन - हर्षल वाघमारे
8.इंग्रजी व्याकरण - लेखक: बाळासाहेब शिंदे/S.P. Bakshi (Objective English)

सरावासाठी:
9. TAIT चे मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका - Anupam Patil / Target Publication


10. Address Matching व वेग-अचूकता सराव साठी - Vitthal Rautwar यांचे पुस्तक
कल चाचणी (Aptitude test)

TAIT Cut Off आणि Merit खालील प्रमाणे


TAIT ला स्वतंत्र पास/नापास नसते. तुमचा स्कोअर जितका जास्त, तितकी नोकरीची संधी जास्त.

Pavitra Portal website वर Final Merit अशी लागते:

Final Merit = TAIT चे गुण (80%) + पदवीचे गुण + TET चे गुण

सुरक्षित स्कोअर किती?

- Open साठी: 160+ / 200

- OBC साठी: 150+ / 200

- SC/ST साठी: 140+ / 200


160 च्या वर गुण असतील तर पहिल्या 3 याद्यांमध्ये नाव येण्याची दाट शक्यता असते.

शिक्षक भरती प्रक्रिया काय आहे?

1. TET + TAIT परीक्षा द्या
2. Pavitra Portal (edustaff.maharashtra.gov.in) वर Registration करा
3. कागदपत्र पडताळणी
4. आवडीनुसार जिल्हा आणि शाळा निवडा
5. नियुक्ती पत्र

FAQ - परीक्षार्थी नेहमी खालील प्रश्न विचारतात

Q1. TAIT परीक्षा वर्षातून किती वेळा होते?
Ans: साधारणपणे शिक्षक भरती निघाली की दर 2-3 वर्षांनी एकदा होते.
Q2. TAIT आणि TET मध्ये काय फरक आहे?
Ans: TET ही पात्रता परीक्षा आहे, तर TAIT ही शिक्षक भरतीसाठीची स्पर्धा परीक्षा आहे.
Q3. TAIT ला निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans: नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही ? 

तुम्हाला TAIT परीक्षेचे स्वरुप अभ्यासक्रम बद्दल माहिती कशी वाटली comment मधे नक्की सांगा.
Thank you.

टिप्पण्या