ऊस तोडणी टोळी कशी बनवली जाते? टोळी मालक मुकादम कसे व्हावे? कारखाना करार 2026
उसतोड टोळी कशी बनवली जाते? मुकादम कसे व्हावे, कारखान्यासोबत करार कसा करावा, एडव्हान्स किती मिळतो, 10 ते 15 लाख कामगारांचा व्यवसाय अगदी सोप्या गावाकडच्या भाषेत समजून घेऊ. मित्रहो व्यवसाय कोणताही असो त्याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान असणे खूप आवश्यक आहे. अन्यथा आपण आपले आर्थिक नुकसान करून घेत असतो हे मात्र नक्की.10 ते 15 लाख लोकांचा व्यवसाय:
महाराष्ट्रात जवळपास 200 साखर कारखाने, 60,000 पेक्षा जास्त वाहन मालक, अंदाजे 55,000 मुकादम आणि जवळपास 10 ते 15 लाख लाख ऊसतोड कामगार या व्यवसायात आहेत. त्यापैकी काही कारखाने सहकारी तर काही private आहेत. शेतकर्यांनी ऊस तोडायचा नसतो, तो कारखाना मुकादमामार्फत तोडून आणतो.
म्हणूनच टोळी मालकाला गावात मुकादम म्हणतात. हाच या व्यवसायाचा खरा मालक असतो.
![]() |
| आनंदी शेतकरी यशस्वी टोळी |
1. ऊसतोड टोळी कशी बनवली जाते?
- एक टोळी म्हणजे 1 ट्रॅक्टर + 1 ट्रॉली + 12 ते 16 लोकांची जोडी.
- एका जोडीत नवरा-बायको असतात. यालाच कोयता म्हणतात.
2. टोळी बनवण्यासाठी काय लागतं?
- माणसं: बीड, धाराशिव, सांगोला, जत, लातूर, परभणी, शिर्डी, कर्नाटक, नाशिक व अति दुष्काळी भागातून मिळतात. हे मजूर म्हणजेच या व्यवसायचा मुख्य केंद्रबिंदू आहे.- विश्वास: हे लोक पैशावर नाही, विश्वासावर येतात. तुम्ही त्यांना पावसाळ्यात एडव्हान्स दिला तरच ते तुमच्या टोळीत येतील.
- राहण्याची सोय: गावाच्या शेजारी शेतात जिथे वीज व पाणी असले पाहिजे.
3. टोळी मालक मुकादम कसे होणार?
तुम्हाला जर मुकादम व्हायचं असेल तर 3 गोष्टी पाहिजेत:A) गावात ओळख: बीड, धाराशिव( महाराष्ट्र) भागात तुमचे नातेवाईक किंवा ओळख असली तर 10-15 जोडपे सहज मिळतात.
B) वाहन: तुमच्याकडे स्वतःचा ट्रॅक्टर किंवा ट्रक असेल तर कारखाना तुम्हाला लगेच करार देतो. नसेल तर तुम्ही वाहन मालकासोबत जोडपे पुरवणारे एजंट म्हणून काम करू शकता.
C) नोटरी आणि आधार लिंक: आता सरकारने नवीन नियम आणला आहे. प्रत्येक मुकादम आणि मजुराची नोंदणी "महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार" या App वर बायोमेट्रिकने होणार आहे. त्यामुळे फसवणूक कमी होईल.
4. साखर कारखान्यासोबत करार कसा करावा?Important
गाळप हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरला सुरू होतो, पण करार जून-जुलैमध्येच होतात.5. कराराची प्रक्रिया
1. गट ऑफिसला भेटा: कारखान्याच्या ऊस विकास अधिकारीला भेटा. त्याला सांगा माझ्याकडे किती कोयते (जोडपे) आहेत.2. एडव्हान्स (उचल): कारखाना तुम्हाला वाहन निहाय उचल देतो. एका ट्रॅक्टर मागे 2 ते 5 लाख रुपये एडव्हान्स मिळतो. काही कारखाने 20 ते 50 कोटींपर्यंत उचल वाटतात.
3. नोटरी करार: 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करार होतो - किती टन ऊस तोडणार, किती दिवस काम करणार, एडव्हान्स किती घेतला.
4. बिल कसं निघतं? टायरगाडी, सेंटर नुसार - प्रति टन 350 ते 450 रुपये तोडणी मजुरी मिळते. त्यातून कारखाना एडव्हान्स कापून घेतो.
सावधान:
सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी कोटींपेक्षा जास्त आर्थिक फसवणूक होते. मुकादम एडव्हान्स घेऊन पळून जातात. त्यामुळे नोटरी शिवाय एक रुपयाही देऊ नका. आता सरकारने यावर 1 वर्ष तुरुंगवास आणि 50,000 दंडाचा कायदा आणला आहे.
पण लक्षात ठेवा
6. टोळी चालवताना नफा किती उरतो?
- 1 एका ट्रॅक्टर+ 1 ट्रॉली दिवसाला 10 ते 12 टन ऊस तोड होतो.
- 1 हंगाम (5 महिने) मध्ये एक टोळी 1500 ते 1800 टन ऊस तोडते.
- खर्च वजा जाता मुकादमाला 2 ते 3 लाख रुपये हंगामाला उरतात. 5 टोळ्या असतील तर 10 ते 15 लाख.
शेतकऱ्याकडून "चिकन, एन्ट्री 200 रु, टोळीला स्वखुशीने 500 रु द्या असा आग्रह धरू नये "असे पैसे घेणे आता बेकायदेशीर आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जेवढी मदत देईल तेवढी स्विकारली पाहिजे.
FAQ:
Q: ऊसतोड टोळीसाठी एडव्हान्स कधी मिळतो?
A: जून ते ऑगस्ट मध्ये. कारखाने बँकेकडून कर्ज काढून हा एडव्हान्स देतात.
Q: मुकादम होण्यासाठी शिक्षण लागतं का?
Q: ऊसतोड टोळीसाठी एडव्हान्स कधी मिळतो?
A: जून ते ऑगस्ट मध्ये. कारखाने बँकेकडून कर्ज काढून हा एडव्हान्स देतात.
Q: मुकादम होण्यासाठी शिक्षण लागतं का?
A: नाही, फक्त माणसं जोडण्याची कला आणि प्रामाणिकपणा लागतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा