10वी / 12वी नंतर करिअर कोर्स निवडताना
10वी आणि 12वी नंतरचा वेळ आयुष्यातील महत्त्वाचा असतो. याच वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे पुढचे career ठरवतो. अनेक विद्यार्थी घाई मधे किंवा इतरांच्या सांगण्यावरून चुकीचा मार्ग निवडतात. आज आपल्याला अशा 5 मोठ्या चुका वाचायला मिळतील त्या तुम्ही अजिबात करू नका.चुक क्रमांक 1: मित्र करतोय म्हणून तोच कोर्स करणे
तुमचा मित्र कॉम्प्युटर सायन्स घेतोय म्हणून तुम्हीही तेच घेणे ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येकाची आवड आणि क्षमता वेगळी असते. त्याला कोडिंग आवडते म्हणून तुम्हाला आवडेलच असे नाही.
काय करावे? स्वतःला विचारा - मला दिवसभर काय करायला आवडेल? माझा छंद काय आहे? त्यावरून करिअर निवडा.
चूक क्रमांक 2: फक्त पॅकेज बघून करिअर निवडणे
"AI मध्ये 20 लाख पॅकेज आहे" हे ऐकून अनेकजण तिकडे धावतात, पण त्या क्षेत्रात मेहनत किती आहे हे बघत नाहीत. जास्त पगाराच्या मागे धावताना जर आवड नसेल तर तुम्ही 2 वर्षात कंटाळून जाल.
काय करावे? पगारासोबतच त्या क्षेत्रात 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला बघता का? याचा विचार करा.
चूक क्रमांक 3: नातेवाईक आणि समाजाच्या दबावाखाली येणे
"शेजारचा मुलगा डॉक्टर झाला, तू पण डॉक्टरच हो" - या दबावाखाली अनेक विद्यार्थी आपले स्वप्न मारतात. डॉक्टर, इंजिनिअर शिवाय पण जगात 500 पेक्षा जास्त उत्तम करिअर आहेत.काय करावे? तुमच्या पालकांशी शांतपणे बोला, त्यांना नवीन करिअर जसे की UI/UX Design, Digital Marketing, Data Science बद्दल माहिती द्या.
चूक क्रमांक 4: फक्त डिग्रीला महत्त्व देणे, स्किल्सकडे दुर्लक्ष करणे
2026 मध्ये डिग्रीपेक्षा स्किल्सला जास्त किंमत आहे. कंपनी तुम्हाला विचारते "तुम्हाला काय येते?" - "तुमची डिग्री कोणती?" हे नाही. फक्त B.A, B.Sc, B.Com करून बसल्याने नोकरी मिळत नाही.काय करावे? डिग्री सोबत एक Trending स्किल नक्की शिका - उदा. AI Tools, Excel, Video Editing, Coding.
चूक क्रमांक 5: रिसर्च न करता कोणत्याही क्लासला पैसे भरणे
इन्स्टाग्रामवर जाहिरात बघून लगेच 30-40 हजार भरून क्लास लावणे. नंतर कळते की तिथे शिकवतच नाहीत. पुण्यात आणि महाराष्ट्रात अशा अनेक फसव्या अकॅडमी आहेत.काय करावे? कोणताही कोर्स करण्यापूर्वी - 1. Review वाचा
2. माजी विद्यार्थ्यांशी बोला 3. फ्री डेमो क्लास घ्या.
महत्त्वाचे 👇
लक्षात ठेवा, करिअर हा 100 मीटरचा Race नाही, तो Marathon आहे. घाई करू नका. स्वतःला वेळ द्या, योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच निर्णय घ्या. एक योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवेल.
तुम्हाला यातला कोणता पॉइंट जास्त पटला? कमेंट मध्ये सांगा.
तुम्हाला यातला कोणता पॉइंट जास्त पटला? कमेंट मध्ये सांगा.
धन्यवाद!!
![]() |
| योग्य निर्णय योग्य करियर |

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा