Reliance Jio IPO लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Reliance Jio IPO लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ ऑक्टोबर, २०२६

Jio Platforms IPO भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आज उघडला. संपूर्ण माहिती

Jio Platforms IPO

तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Reliance च्या Jio Platforms चा बहुप्रतिक्षित IPO आज, 21 ऑक्टोबर 2026 रोजी उघडला आहे. हा भारतातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO असणार आहे.

चला, हा IPO काय आहे, किंमत काय आहे, आणि सामान्य गुंतवणूकदाराने अर्ज करावा का? हे सोप्या भाषेत समजून घेऊया.

Jio Platforms IPO - महत्वाची माहिती एका नजरेत तपशील माहिती

  • कंपनीच नाव-Jio Platforms Ltd (Reliance Industries ची उपकंपनी)
  • IPO उघडण्याची तारीख 21 ऑक्टोबर 2026 (आज)
  • IPO बंद होण्याची तारीख 23 ऑक्टोबर 2026
  • Price Band (किंमत) Rs. 1,065 ते Rs. 1,119 प्रति शेअर
  • Lot Size 12 शेअर्स (किमान गुंतवणूक Rs. 13,428)
  • Issue Size Rs. 30,213 कोटी - भारतातील सर्वात मोठा
  • Listing Date 28 ऑक्टोबर 2026 (BSE & NSE वर)
  • Anchor Investors Date 19 ऑक्टोबर 2026

Jio Platforms म्हणजे काय?

Jio Platforms ही फक्त Jio SIM ची कंपनी नाही. यामध्ये येतात:

- Reliance Jio Infocomm (Telecom)

- JioCinema, JioSaavn, JioTV

- JioMart, Jio Financial Services

- AI आणि 5G टेक्नॉलॉजी बिझनेस

कंपनीने FY26 मध्ये Rs. 1,46,885 कोटीचा महसूल व कित्तेक कोटीचा नफा कमावला आहे.

या IPO चे पैसे कुठे वापरणार?


कंपनीने सांगितले आहे की या IPO मधून मिळालेल्या पैशांपैकी Rs. 27,500 कोटी कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील, उरलेले पैसे कंपनीच्या वाढीसाठी.

कोणाला सूट मिळणार?


1. Reliance च्या कर्मचाऱ्यांना: प्रत्येक शेअरवर Rs. 54 सूट

2. Reliance च्या शेअरहोल्डर्सना: Rs. 2,500 कोटींचे शेअर्स राखीव आहेत. पण महत्वाची गोष्ट - 14 ऑक्टोबर 2026 पर्यंत ज्यांच्याकडे RIL चे शेअर्स होते, तेच पात्र असतील.

GMP काय सांगतो? लिस्टिंगमध्ये फायदा होईल का?

आजच्या Grey Market नुसार Jio चा GMP सुमारे Rs. 251 म्हणजेच 22% प्रीमियमवर आहे. याचा अर्थ लिस्टिंगला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पण GMP हा अधिकृत आकडा नाही, यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.

तुम्ही अर्ज कसा व का करावा?

गव्हर्न्मेंट approved trading app च्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर तुम्हांला फोन pay किंवा इतर UPI app मध्ये payment mandate येईल. ते तुम्हाला approve करावे लागेल. Ipo ची ठरलेली रक्कम 7 ते 8 दिवसांसाठी लॉक होईल. म्हणजेच तुमचा अर्ज यशस्वी झाला याची खात्री होईल.

- भारतातील सर्वात मोठी डिजिटल कंपनी

- Jio चे 50 कोटींहून अधिक युजर्स

- मजबूत पॅरेंट कंपनी - Reliance

- 5G आणि AI मध्ये भविष्य

जोखीम:

- IPO ची किंमत जास्त वाटू शकते.

- टेलिकॉममध्ये मोठी स्पर्धा

तात्पर्य- तुम्ही लाँग टर्म गुंतवणूकदार असाल, तर हा IPO चुकवू नका. 5-10 वर्षांसाठी ही एक उत्तम संधी असू शकते. पण फक्त लिस्टिंग गेन साठी येत असाल, तर विचार करून गुंतवणूक करा.

Jio Platforms IPO 2026
Jio ipo


Jio Platforms IPO भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आज उघडला. संपूर्ण माहिती

Jio Platforms IPO तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Reliance च्या Jio Platforms चा...