Computer Course करून Job कसा मिळवायचा? Python, Java पासून नोकरीपर्यंत संपूर्ण माहिती

आज प्रत्येक कंपनीला Computer चालवता येणारी माणसं हवी आहेत. तुम्ही 10वी, 12वी किंवा Graduation झालात तरी फक्त एक योग्य Computer Course जसे Python किंवा Java  तुम्हाला ₹30,000 ते ₹80,000 महिना पगाराची नोकरी देऊ शकतात. पण मार्केटमध्ये इतके कोर्सेस आहेत की विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. इथे तुम्हाला खूप सोप्या भाषेत माहिती दिली आहे. 

1. Computer Language म्हणजे काय?

आपण मराठीत बोलतो, 🖥 Computer ला आपली भाषा कळत नाही. त्याला फक्त 0 आणि 1 कळतो. म्हणून त्याला सूचना देण्यासाठी बनवलेल्या भाषेला Programming Language म्हणतात. जसं इंग्लिश शिकल्यावर तुम्ही जगात कुठेही बोलू शकता, तसं एक Computer Language शिकलात तर तुम्ही App, Website, Game बनवू शकता.

2. Beginners साठी Top 5 Computer Courses Job साठी Best

A) Python 

सगळ्यात सोपी आणि जास्त पगार देत असलेली Python ही कॉम्प्युटर भाषा आज जगातील नंबर 1 ची भाषा आहे. कारण 
  • सोपी आहे: इंग्लिश सारखं लिहायचं असतं. `print("Hello")` एवढंच!
  •  कुठे वापरतात: Google, YouTube, Instagram सगळे Python वरच चालतात. AI, Data Science, Website Back-end मध्ये याचाच वापर होतो.
  • कोर्स कालावधी: 3 ते 6 महिने
  • नोकरी: Python Developer, Data Analyst, AI Engineer
  • पगार: Fresher ला पुणे, मुंबई, Amazon, Microsoft सारख्या IT company मधे ₹30,000 - ₹55,000 पासून सुरुवात. 
Python मध्ये काय शिकाल?
Variables, Loops, Functions, Django (Website बनवण्यासाठी), आणि थोडं Data Science.

B) Full Stack Web Development

तुम्ही Facebook सारखी Website बनवू शकता. यात 2 भाग असतात:

1.Front-End (दिसणारा भाग): HTML, CSS, JavaScript, React

2.Back-End (मागचा भाग): http://Node.js किंवा Python

हा कोर्स करून तुम्ही एकट्याने पूर्ण Website बनवू शकता. ही भाषा अवगत केल्यावर नोकरीची संधी खूप जास्त असते.

C) Data Science & AI

भविष्य हे AI चे आहे. कंपन्यांकडे भरपूर Data असतो, त्यातून माहिती काढण्यासाठी Data Scientist लागतो. यात Python + Machine Learning शिकावं लागतं.

D) Java

मित्रांनो बँका, संस्था, मोठ्या कंपन्यांचे Software Java वर चालतात. सरकारी नोकरी आणि मोठ्या MNC मध्ये Java ला खूप Value आहे. थोड कठीण आहे पण एकदा शिकलात तर नोकरी पक्की. हे शिकण्यासाठी तुम्हाला भरपूर online टीचर मिळतील. तेही अगदी कमी फीस मधे. 

E) Tally + MS-Excel + Advanced Excel

तुम्हाला Programming नको असेल तर हा बेस्ट पर्याय. प्रत्येक दुकान, ऑफिस, कंपनीला Tally आणि Excel येणारा माणूस लागतोच. 2 महिन्यात कोर्स होतो आणि लगेच अकाउंटंटची नोकरी मिळते.

3. कोणता कोर्स निवडावा? तुमच्यासाठी सोपा Formula

- तुम्हाला गणित आणि लॉजिक आवडतं, जास्त पगार हवा आहे -> Python / Data Science

- तुम्हाला डिझाईन आणि Website बनवायला आवडतं -> Full Stack Web Development

- तुम्हाला स्थिर आणि मोठ्या कंपनीत नोकरी हवी आहे -> Java

- तुम्हाला लवकरात लवकर नोकरी हवी आहे, Programming नको -> Tally + Excel

4. Job मिळवण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी

फक्त सर्टिफिकेट घेऊन नोकरी मिळत नाही.

1.Project बनवा: कोर्समध्ये शिकलात त्या वर 2-3 छोटे Projects बनवा. उदा. Calculator, To-Do List Website, किंवा Python ने बनवलेला छोटा गेम. हाच तुमचा Resume असेल.

2.GitHub आणि LinkedIn: तुमचे Projects GitHub वर टाका आणि LinkedIn प्रोफाइल एकदम प्रोफेशनल बनवा. HR तिथेच तुम्हाला शोधतात.

3.Internship: सुरुवातीला ₹10,000 ची जरी Internship मिळाली तरी करा. 3 महिन्याचा अनुभव तुम्हाला ₹30,000 च्या नोकरी पर्यंत घेऊन जाईल.

Python Java Computer Language
Python Java programming 

Conclusion👇

आज डिग्री पेक्षा Skill ला जास्त महत्व आहे. एक Computer Language 100% परफेक्ट येत असेल तरी तुम्ही बेरोजगार राहणार नाही. तर आजपासून Python किंवा Java भाषा शिकायला सुरुवात करा. YouTube वर Free मध्ये Code With Harry किंवा Programming with Mosh बघा, आवडलं तरच Paid Course घ्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.