How to Learn Chinese Language - चिनी भाषा कशी शिकावी?
How to Learn Chinese Language
चिनी भाषा कशी शिकावी?
आजच्या काळात English येणं सामान्य झालं आहे, पण Chinese (Mandarin) भाषा येत असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये 2 ते 7 लाखांपर्यंत जास्त पगार नक्कीच मिळू शकतो. चला तर पाहूया, आपण चिनी भाषा कशाप्रकारे आत्मसात करू शकतो ते भाषा मंथन करुयात.
1. अगोदर चिनी भाषा शिकण्याचे फायदे पाहू.
- जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा - 1.2 अब्ज लोक बोलतात.- नोकरीच्या संधी: Translator, Interpreter, MNC Jobs, Embassy Jobs, Tourism, BPO मध्ये Chinese Language चे ज्ञान असणाऱ्यांनाच प्रचंड मागणी आहे.
- पगार: एका सामान्य Translator ला सुरुवातीला Rs. 4 - 7 LPA मिळतो.
![]() |
| Learn Chinese |
2. चिनी भाषा शिकण्याचे 5 स्टेप -अगदी सोप्या भाषेत
Step 1: Pinyin पासून सुरुवात करा
चिनी भाषेत A, B, C नसतात. त्यात चित्रलिपी (Characters) असतात. आधी Pinyin म्हणजे चिनी शब्दांचा उच्चार रोमन लिपीत कसा करायचा हे शिका.Step 2: रोज 10 Characters लिहा
Mandarin मध्ये 50,000 Characters आहेत, पण रोजच्या बोलण्यासाठी फक्त 2500 पुरेसे आहेत. रोज 10 शब्द लिहिण्याची सवय लावा.Step 3: HSK Exam ला टार्गेट करा
जसे English साठी IELTS आहे, तसेच Chinese साठी HSK (Hanyu Shuiping Kaoshi) ही आंतरराष्ट्रीय परीक्षा आहे. HSK 1 ते HSK 6 असे 6 लेव्हल आहेत. HSK 3 पास झाला की तुम्हाला नोकरी मिळू लागते.Step 4: Online + Offline चा वापर
- Apps: Duolingo, HelloChinese, Pleco Dictionary (Best आहे)- YouTube: ChineseClass101
- दररोज 1 तास ऐकणे (Listening) आणि 30 मिनिटे बोलणे (Speaking) करा.
Step 5: बोलण्याची भीती घालवा
चिनी लोक टोनवर बोलतात. एकाच शब्दाचा टोन बदलला की अर्थ बदलतो. म्हणून लाजू नका, चुका करा पण बोला.3. चिनी भाषा शिकण्यासाठी भारतातील टॉप कॉलेज खालील प्रमाणे आहेत.
महाराष्ट्र आणि भारतातील काही सर्वोत्तम कॉलेजची यादीA) महाराष्ट्रातील कॉलेज
1. Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), छत्रपती संभाजीनगर - BA in Chinese Language, फी फक्त ~Rs. 24,000
2. Symbiosis Institute of Foreign and Indian Languages (SIFIL), पुणे - Certificate ते PhD पर्यंत सर्व कोर्सेस
3. Mumbai University - Confucius Institute, Kalina Campus, मुंबई - हा चीन सरकारचाच अधिकृत इन्स्टिट्यूट आहे, HSK परीक्षेचे सेंटर सुद्धा आहे. फी खूप कमी
B) भारतातील टॉप कॉलेज
4. Jawaharlal Nehru University (JNU), दिल्ली - भारतात चिनी भाषेसाठी No.1 कॉलेज मानले जाते. BA (Hons) Chinese - फी फक्त Rs. 959 प्रति वर्ष5. Aligarh Muslim University (AMU) - BA (Hons) Chinese
6. Delhi University (DU) - St. Stephens, Ramjas, Daulat Ram College - Part-time Certificate/Diploma कोर्सेस. तुम्ही इतर शिक्षणासोबत करू शकता.
7. Banaras Hindu University (BHU), Varanasi
8. Visva-Bharati University, Shantiniketan e60a
4. फी आणि कालावधी
- Certificate Course: 6 महिने ते 1 वर्ष, फी Rs. 5,000 - Rs. 15,000
- Diploma Course: 1 वर्ष, फी Rs. 5,565 - Rs. 1,70,000 पर्यंत
- BA (Hons) Chinese: 3 वर्षे
चिनी भाषा अवघड वाटते, पण ती अशक्य नाही. रोज 1 तास दिला तर 1 वर्षात तुम्ही HSK 3 पर्यंत आरामात पोहोचू शकता. जर तुम्ही मराठवाड्यात असाल तर BAMU किंवा पुण्याच्या SIFIL College पासून सुरुवात करणे सर्वात सोपे आणि फायदेशीर ठरेल. मित्रांनो अजून माहिती हवी असेल तर comment मध्ये सांगा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा