Tennis Cricket Bowling Tips - टेनिस क्रिकेट बॉलिंग टिप्स
Tennis cricket Bowling Tips-
टेनिस क्रिकेट बॉलिंग टिप्स
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भन्नाट बॉलिंग कशी टाकावी? 5 सोप्या टिप्सने बना टीम चा विश्वासू बॉलर. तुम्ही पण टेनिस बॉल क्रिकेट खेळता आणि प्रत्येक वेळी 6 खाता? टेन्शन घेऊ नका. लेदर बॉलच्या टिप्स टेनिस बॉलला चालत नाहीत. टेनिस बॉलसाठी वेगळीच ट्रिक आहे. चला सोप्या भाषेत शिकूया.
1. लांबून पळत येऊ नका - छोटा रन-अप ठेवा
- टेनिस बॉल खूप हलका असतो. तुम्ही जर लेदर सारखा 20 पावलं पळून आलात तर बॉलचा कंट्रोल जाईल आणि तो फुलटॉस होईल.
- त्यासाठी फक्त 8 ते 10 पावलांचा रन-अप ठेवा.
- जागेवर उभे राहून हाताच्या जोरावर बॉल टाका. याने बॉल अचूक जागेवर पडेल.
2. वेगापेक्षा जागा (Line & Length) महत्त्वाची
- टेनिस क्रिकेटमध्ये जो फास्ट टाकतो तो जास्त मार खातो. कारण हलका बॉल बॅटला सहज येतो.
- सगळ्यात बेस्ट जागा कोणती?पायावर (Yorker): नवीन टेनिस बॉल असेल तर नेहमी पायावर टाका. टेनिसमध्ये पायावरचा बॉल मारणे सगळ्यात अवघड असते.
- खांद्यावर (Short): जुना चेंडू असेल तर थोडा उंचावर, खांद्याजवळ टाका. जुना बॉल उसळत नाही, त्यामुळे बॅट्समन फसतो.
3. दोन प्रकारे गोलंदाजी आवश्यक
👉 तुम्हाला 10 प्रकारचे बॉल शिकायची गरज नाही. दोन टाइप ची प्रॅक्टिस करा:
A) फास्ट यॉर्कर: पूर्ण ताकदीने सरळ पायावर. हा तुमचा हुकुमाचा एक्का आहे.
B) स्लोअर बॉल (गती बदल):हा टेनिसमधला सगळ्यात घातक बॉल आहे. हात फिरवायचा वेगात आहे असे दाखवा, पण बॉल सोडताना अगदी हळू सोडा. बॅट्समन आधीच फटका मारून बाद होतो.
एक फास्ट, एक स्लो - याच चक्रात बॅट्समनला ठेवा.
4. बोटांची जादू
- टेनिस बॉलला सीम (दोऱ्याचे विणकाम) नसते, त्यामुळे तो बोटांनीच फिरवायचा असतो.
- -ल चेंडूला घासून (रब करून) टाका. याने बॉल स्पिन होईल.
- हातावर थोडा घाम आला की बॉलच्या एका बाजूला लावा आणि एक बाजू कोरडी ठेवा, बॉल आपोआप स्विंग होईल.
![]() |
| Cricket Bowling Tips |
5. रोज 10-15 मिनिटांचा सराव
🏏 चांगला बॉलर होण्यासाठी फक्त अचूकतेची गरज आहे.
🏏 एक वीट स्टम्प म्हणून ठेवा. 10 मीटरवरून रोज वीटेला मारण्याचा प्रयत्न करा
- -10 बॉल यॉर्कर
- 10 बॉल स्लोअर
- 10 बॉल खांद्यावरचे
🏏 फक्त 15 दिवस हा सराव करा, तुमच्या परिसरातील चांगले बॅट्समन तुमच्या Bowling ला मोठा फटका मारताना नक्किच गोंधळून जातील.
महत्त्वाचे: टेनिस क्रिकेटमध्ये डॉट बॉल हाच विकेट आहे. विकेट घ्यायच्या मागे लागू नका, कमी रन द्यायच्या मागे लागा, विकेट आपोआप मिळतील.
तुम्हाला या Tips आवडल्या असतील तर नक्की तुमच्या मित्राला forward करा.

Post a Comment