सोमवार, २८ सप्टेंबर, २०२६

TAIT परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम

TAIT परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम

TAIT परीक्षा महाराष्ट्र शासना मार्फत घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा आहे. मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक भरती केली जाते. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येते. निगेटिव्ह गुण पद्धत नसते. परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम खालील प्रमाणे असते.

TAIT परीक्षा स्वरुप अभ्यासक्रम
TAIT परीक्षा अभ्यासक्रम 

  • TAIT परीक्षेचे स्वरुप अभ्यासक्रम : Syllabus, Cut Off, पात्रता आणि शिक्षक भरती संपूर्ण माहिती
  • TAIT परीक्षा 2026 - शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे.
  • TAIT म्हणजेच Teacher Aptitude and Intelligence Test. या परीक्षेशिवाय तुम्हाला Pavitra Portal वर शिक्षक भरतीसाठी अर्जच करता येणार नाही.

TAIT Exam साठी पात्रता काय आहे?

1. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
2. Graduation + D.Ed किंवा B.Ed पूर्ण असणे गरजेचे आहे
3. TET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक. (D.ed धारक)
4. वयोमर्यादा: 18 ते 43 वर्षे (sc,st 5 वर्ष सूट)

TAIT परीक्षा स्वरुप

  • TAIT मध्ये एकूण 200 प्रश्न आणि 200 गुण असतात. वेळ 2 तास.
  • Aptitude Test (कल चाचणी) - 120 गुण: यात गणित, मराठी, इंग्रजी, तर्कशक्ती आणि व्यक्तिमत्व चाचणी असते.
  • Intelligence Test (बुद्धिमत्ता चाचणी) - 80 गुण: यात आकलन, वर्गीकरण, सांकेतिक भाषा, सहसंबंध हे विषय असतात.
  • Negative Marking नाही

TAIT अभ्यासक्रम 2026

अभियोग्यता - 120 प्रश्न आणि गुण 
1. मराठी भाषा - 15 15
2. इंग्रजी भाषा - 15 15
3. सामान्य ज्ञान - 30 30
4. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - 30 30
5. अंकगणित / गणितीय क्षमता - 30 30

बुद्धिमत्ता - 80 प्रश्न

बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning) - 80 गुण
सविस्तर अभ्यासक्रम

अभियोग्यता (Aptitude) - यात 8 उपघटक येतात:

1. गणितीय क्षमता: संख्यामाला, BODMAS, गुणोत्तर प्रमाण, भागीदारी, काळ-काम-वेग, सरासरी, नफा-तोटा, सरळव्याज चक्रवाढ व्याज
2. भाषिक क्षमता (मराठी): वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी / विरुद्धार्थी, म्हणी व वाक्प्रचार, प्रसिद्ध पुस्तके-लेखक
3. भाषिक क्षमता (इंग्रजी): Grammar - Tense, Voice, Narration, Article, Synonyms, Antonyms, Spelling, Idioms & Phrases
4. वेग आणि अचूकता: पत्ते जुळवणे (Address Matching)
5. अवकाशीय क्षमता आकृत्या, आरशातील प्रतिमा
6. सामान्य ज्ञान:इयत्ता 8 ते 12 वी च्या क्रमिक पुस्तकांवर आधारित सामान्य ज्ञान
7. कल / आवड व समायोजन / व्यक्तिमत्व: शिक्षकाची आवड, छंद, परिस्थितीजन्य प्रश्न
8. बालमानसशास्त्र:पियाजे, कोहलबर्ग, वायगोत्स्की यांचे सिद्धांत, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, विशेष गरजा असणारी मुले

बुद्धिमत्ता (Intelligence) 

आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा (Coding-Decoding), लयबद्ध मांडणी, रक्तसंबंध, दिशा ज्ञान, बैठक व्यवस्था, Puzzle, Syllogism, Inequality

TAIT साठी सर्वोत्तम पुस्तके व लेखक

एकत्रित तयारीसाठी (All-in-One):
1. MAHA TAIT संपूर्ण मार्गदर्शक - लेखक: अनुपम पाटील - Smart Study Publication - सर्वात जास्त विकले जाणारे पुस्तक
2. TAIT अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - लेखक: अंकुश शिंगाडे - दीपस्तंभ प्रकाशन
3. MAHA TAIT 120 + 80 पॅटर्न - नितीन महाले / साकेत प्रकाशन

विषयानुसार पुस्तके:
4. बुद्धिमत्ता चाचणी - लेखक: आर. एस. अग्रवाल (मराठी आवृत्ती) - बेसिक ते Advance Reasoning साठी बेस्ट
5. अंकगणित व गणितीय क्षमता - लेखक: पंढरीनाथ राणे किंवा आर. एस. अग्रवाल

6. मराठी व्याकरण - लेखक: बाळासाहेब शिंदे/ मो. रा. वाळिंबे
7.बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र- लेखक: दुनाखे सर / के'सागर प्रकाशन - हर्षल वाघमारे
8.इंग्रजी व्याकरण - लेखक: बाळासाहेब शिंदे/S.P. Bakshi (Objective English)

सरावासाठी:
9. TAIT चे मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका - Anupam Patil / Target Publication


10. Address Matching व वेग-अचूकता सराव साठी - Vitthal Rautwar यांचे पुस्तक
कल चाचणी (Aptitude test)

TAIT Cut Off आणि Merit खालील प्रमाणे


TAIT ला स्वतंत्र पास/नापास नसते. तुमचा स्कोअर जितका जास्त, तितकी नोकरीची संधी जास्त.

Pavitra Portal website वर Final Merit अशी लागते:

Final Merit = TAIT चे गुण (80%) + पदवीचे गुण + TET चे गुण

सुरक्षित स्कोअर किती?

- Open साठी: 160+ / 200

- OBC साठी: 150+ / 200

- SC/ST साठी: 140+ / 200


160 च्या वर गुण असतील तर पहिल्या 3 याद्यांमध्ये नाव येण्याची दाट शक्यता असते.

शिक्षक भरती प्रक्रिया काय आहे?

1. TET + TAIT परीक्षा द्या
2. Pavitra Portal (edustaff.maharashtra.gov.in) वर Registration करा
3. कागदपत्र पडताळणी
4. आवडीनुसार जिल्हा आणि शाळा निवडा
5. नियुक्ती पत्र

FAQ - परीक्षार्थी नेहमी खालील प्रश्न विचारतात

Q1. TAIT परीक्षा वर्षातून किती वेळा होते?
Ans: साधारणपणे शिक्षक भरती निघाली की दर 2-3 वर्षांनी एकदा होते.
Q2. TAIT आणि TET मध्ये काय फरक आहे?
Ans: TET ही पात्रता परीक्षा आहे, तर TAIT ही शिक्षक भरतीसाठीची स्पर्धा परीक्षा आहे.
Q3. TAIT ला निगेटिव्ह मार्किंग आहे का?
Ans: नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही ? 

तुम्हाला TAIT परीक्षेचे स्वरुप अभ्यासक्रम बद्दल माहिती कशी वाटली comment मधे नक्की सांगा.
Thank you.

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

10वी /12वी नंतर करिअर निवडताना

10वी / 12वी नंतर करिअर कोर्स निवडताना

    10वी आणि 12वी नंतरचा वेळ आयुष्यातील महत्त्वाचा असतो. याच वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे पुढचे career ठरवतो. अनेक विद्यार्थी घाई मधे किंवा इतरांच्या सांगण्यावरून चुकीचा मार्ग निवडतात. आज आपल्याला अशा 5 मोठ्या चुका वाचायला मिळतील त्या तुम्ही अजिबात करू नका.

चुक क्रमांक 1: मित्र करतोय म्हणून तोच कोर्स करणे


तुमचा मित्र कॉम्प्युटर सायन्स घेतोय म्हणून तुम्हीही तेच घेणे ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येकाची आवड आणि क्षमता वेगळी असते. त्याला कोडिंग आवडते म्हणून तुम्हाला आवडेलच असे नाही.
काय करावे? स्वतःला विचारा - मला दिवसभर काय करायला आवडेल? माझा छंद काय आहे? त्यावरून करिअर निवडा.

चूक क्रमांक 2: फक्त पॅकेज बघून करिअर निवडणे


"AI मध्ये 20 लाख पॅकेज आहे" हे ऐकून अनेकजण तिकडे धावतात, पण त्या क्षेत्रात मेहनत किती आहे हे बघत नाहीत. जास्त पगाराच्या मागे धावताना जर आवड नसेल तर तुम्ही 2 वर्षात कंटाळून जाल.

काय करावे? पगारासोबतच त्या क्षेत्रात 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला बघता का? याचा विचार करा.

चूक क्रमांक 3: नातेवाईक आणि समाजाच्या दबावाखाली येणे

"शेजारचा मुलगा डॉक्टर झाला, तू पण डॉक्टरच हो" - या दबावाखाली अनेक विद्यार्थी आपले स्वप्न मारतात. डॉक्टर, इंजिनिअर शिवाय पण जगात 500 पेक्षा जास्त उत्तम करिअर आहेत.

काय करावे? तुमच्या पालकांशी शांतपणे बोला, त्यांना नवीन करिअर जसे की UI/UX Design, Digital Marketing, Data Science बद्दल माहिती द्या.

चूक क्रमांक 4: फक्त डिग्रीला महत्त्व देणे, स्किल्सकडे दुर्लक्ष करणे

2026 मध्ये डिग्रीपेक्षा स्किल्सला जास्त किंमत आहे. कंपनी तुम्हाला विचारते "तुम्हाला काय येते?" - "तुमची डिग्री कोणती?" हे नाही. फक्त B.A, B.Sc, B.Com करून बसल्याने नोकरी मिळत नाही.

काय करावे? डिग्री सोबत एक Trending स्किल नक्की शिका - उदा. AI Tools, Excel, Video Editing, Coding.

चूक क्रमांक 5: रिसर्च न करता कोणत्याही क्लासला पैसे भरणे

इन्स्टाग्रामवर जाहिरात बघून लगेच 30-40 हजार भरून क्लास लावणे. नंतर कळते की तिथे शिकवतच नाहीत. पुण्यात आणि महाराष्ट्रात अशा अनेक फसव्या अकॅडमी आहेत.

काय करावे? कोणताही कोर्स करण्यापूर्वी - 1. Review वाचा 
2. माजी विद्यार्थ्यांशी बोला 3. फ्री डेमो क्लास घ्या.

महत्त्वाचे 👇

लक्षात ठेवा, करिअर हा 100 मीटरचा Race नाही, तो Marathon आहे. घाई करू नका. स्वतःला वेळ द्या, योग्य मार्गदर्शन घ्या आणि मगच निर्णय घ्या. एक योग्य निर्णय तुम्हाला आयुष्यभर आनंदी ठेवेल.

तुम्हाला यातला कोणता पॉइंट जास्त पटला? कमेंट मध्ये सांगा. 
धन्यवाद!!
योग्य निर्णय
योग्य निर्णय योग्य करियर 

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२६

Job Opportunities in AI

Job Opportunities in AI: More Than Just Coding

AI Artificial Intelligence is no longer a future concept. It is already reshaping how we work. And with that change comes a wave of new career opportunities, not just for engineers, but for creators, analysts, and problem-solvers too.


If you are thinking about a career in AI, here are the main roles in 2026👉

Ai job Opportunities
AI job in India

1. AI / Machine Learning Engineer

The builders. They design and train the models behind chatbots, recommendations, and self-driving tech. Strong skills in Python, data structures, and math are key.


2. Prompt Engineer & AI Product Specialist

One of the fastest growing roles. Companies need people who can get the best out of AI tools, write effective prompts, and integrate AI into real business workflows.


3. Data Scientist & Data Analyst

AI runs on data. Data professionals who can clean, interpret, and find insights from data are in huge demand across healthcare, finance, agriculture, and marketing.


4. AI Ethics and Policy Specialist

As AI becomes more powerful, we need people to make it fair, safe, and responsible. This role mixes technology, law, and philosophy.


5. AI in Domain-Specific Roles

You do not have to be in tech to work in AI.


- Healthcare: AI for medical imaging and drug discovery

- Agriculture: AI for crop prediction and precision farming

- Education: AI tutors and personalized learning

- Content & Marketing: AI-assisted writing, video, and design

How to Get Started?

- Learn the basics: Start with Python, statistics, and a free course like Google's AI Essentials or Andrew Ng's Machine Learning course.

- Pick a niche: Combine AI with what you already know. AI + your field is more valuable than AI alone.

- Build, don't just learn: Create 2-3 small projects and put them on GitHub or LinkedIn. A working project speaks louder than a certificate.

Top Government Institutes

1.IIT Madras (Chennai):
Offers B.Tech, M.Tech, and advanced certifications via the Wadhwani School of Data Science and AI.
2.IIT Hyderabad: Known for being one of the first IITs to offer a full-fledged B.Tech in Artificial Intelligence.
3.IIT Bombay & IIT Delhi: Offer premier B.Tech, M.Tech, and research programs in AI and Data Science.
4.IISc Bangalore: Runs high-end AI, MLOps, and agentic AI certification tracks for professionals.
5.IIIT Hyderabad: Renowned for research-heavy undergraduate and postgraduate AI and IT programs.

The best part about AI careers is that you do not need a PhD to enter. You need curiosity, consistency, and the willingness to learn alongside the technology.


AI will not replace people. People who know AI will replace people who don't.☺

रविवार, ८ जून, २०२५

All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती

All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती

मित्रहो बदलत्या काळानुसार पैसा मिळवण्याचे आणि तो वाढवण्याचे विविध पर्याय आपल्याकडे असले पाहिजेत.त्या उद्देशानेच All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. अनेक लोकांना याबद्दल बोलताना पाहिले असेल यासंबंधात आपण खुप लेख इंटरनेटवर पाहिले असतील,यातील बरेच लेख आपल्याला या गोष्टीबद्दल योग्य माहिती देत नाहीत,आणि अर्ध्या अपूर्ण माहितीमुळे मात्र आपण गोंधळून जातो.


All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती
All About Share Market 

लोकांना Share Market मध्ये गुंतवणूक करायची असते परंतु Share Market विषयी योग्य माहिती नसल्यामुळे ते एकतर Share Market मध्ये Invest करणे टाळतात आणि शेअरमध्ये पैसे गुंतवत नाहीत किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यांचे पैसे गमावतात.स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजाराला बरीच नावे आहेत. “Share ” हा इंग्रजी भाषेचा शब्द आहे. याचा सर्वात सोपा आणि साधा अर्थ म्हणजे “भाग”. आणि स्टॉक मार्केट जे आहे, ते याच “भाग” म्हणजेच “Share ” च्या तत्त्वावर कार्य करते.

समजा एखाद्या कंपनीने एक लाख शेअर्स जारी केले आहेत. आता जर एखाद्या व्यक्तीने त्या कंपनीतील काही Share विकत घेत असेल तर तो त्या शेअर्सचा मालक बनतो. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीचे 1 लाख पैकी 40,000 शेअर्स खरेदी केल्यास त्या कंपनीत त्याचा हिस्सा 40% असेल. आणि तो 40% वाटा त्याच्या मालकीचा असेल.

BSE व NSE 🏤

BSE (Bombay Stock Exchange) हा भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज मानला जातो. 1875 मध्ये भारताची पहिली स्टॉक एक्सचेंज म्हणून त्याची स्थापना झाली. भारताचा दुसरा स्टॉक एक्सचेंज म्हणजे NSE (National stock exchange of India). 1992 मध्ये याची स्थापना केली गेली.(All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती)

⇛IPO म्हणजे काय ?

कंपन्यांच्या share चे किंवा Stock चे मूल्य बीएसई मध्ये नोंदविले जाते. कंपनीच्या नफानुसार सर्व कंपन्यांच्या Share चे मूल्य कमी होते किंवा वाढत जाते. संपूर्ण बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे काम भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) करते. जेव्हा SEBI एखाद्या कंपनीला परवानगी देते तेव्हाच ती कंपनी आपली Initial public offering जाहीर करू शकते. कोणतीही कंपनी सेबीच्या परवानगीशिवाय IPO देऊ शकत नाही.

जेव्हा एखादी खासगी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स (शेअर बाजारात) सार्वजनिक गुंतवणूकदारांना विकते, तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात.

⇛Share Market मध्ये कंपनी केव्हा दिसते ?

share Market म्हणजेच Stock Market मध्ये सूचीबद्ध होण्यासाठी किंवा दृश्यमान होण्यासाठी, कंपनीला Exchange कडून लेखी अनेक करार करावे लागतात, त्या कराराअंतर्गत कंपनीला वेळोवेळी आपल्या क्रियांची माहिती बाजाराला द्यावी लागते, अशा या माहितीमध्ये गुंतवणूकदारांच्या हितावर परिणाम करणाऱ्या माहिती सुद्धा समाविष्ठ असतात.

कंपनीचे मूल्यांकन कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे केले जाते आणि या मूल्यांकनाच्या आधारावर मागणी कमी वा जास्त झाल्यास त्या कंपनीच्या Share ची किंमतीची चढउतार होते. जर कोणतीही कंपनी लिस्टिंग कराराच्या नियमांचे पालन करीत नाही आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यास सेबीकडून त्यास एक्सचेंजमधून काढून टाकण्यासाठी कारवाई केली जाते.

या व्यतिरिक्त स्टॉक मार्केटमध्ये दिसण्यासाठी कंपनीला बर्याच गोष्टी पार कराव्या लागतात. जसे की मागील 3 वर्षातील कंपनीचे संपूर्ण रेकॉर्ड, कंपनीचा 2 कोटींपेक्षा जास्त बाजारामध्ये वाटा असायला हवा, IPO साठी अर्जदार कंपनीची भांडवल किमान 10 Cr आणि FPO साठी 3 Cr असायला पाहिजे या सर्व गोष्टी व्यतिरिक्त, कंपनी listing केल्यावर बर्याच गोष्टींची काळजी घेतली जाते आणि कडक नियम पाळावे लागतात.

शेअर्सचे प्रकार

बरेच प्रकारचे शेअर्स असू शकतात आणि भिन्न लोक त्यांची व्याख्या वेगळ्या प्रकारे करतात. परंतु आम्ही Shares प्रामुख्याने 3 विभागात विभागले आहेत.

1) Common Shares – याला कोणीही खरेदी करू शकतात आणि आवश्यक असल्यास विक्री करू शकता येते. हि सर्वात सामान्य पद्धतीचे Share असतात.

२) Bonus Shares – जेव्हा एखादी कंपनी चांगला नफा कमावते आणि त्या कंपनीला त्यातील काही हिस्सा आपल्या भागधारकांना द्यायचा असतो. पण यामध्ये ती share ऐवजी पैसे देत नाही, जर Share दिले तर त्याला Bonus Shares म्हणतात.

3) Preferred Shares – हि shares कंपनीकडून काही विशिष्ट लोकांसाठीच आणला जातो. जेव्हा एखाद्या कंपनीला पैशांची आवश्यकता असते आणि मार्केटमधून काही पैसे उभे करायचे असतात तेव्हा ते जे शेअर्स जारी करतात ते त्या विशिष्ट लोकांनाच खरेदी करण्याचा प्रथम अधिकार देतात. जसे की एखाद्या कंपनीत काम करणारे कर्मचारी. असे शेअर्स खूप सुरक्षित मानले जातात. All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती

Stocks खरेदी

जर आपण ब्रोकरची मदत घेत असाल तर प्रथम आपल्याला आपले खाते उघडावे लागेल, ज्यास Demat Account म्हटले जाते. जे आपण आपल्या ब्रोकरद्वारे उघडू शकता. ब्रोकरमार्फत Stocks खरेदी करण्यात खूप फायदा होतो, एक म्हणजे तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळेल आणि दुसरे म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराची पूर्ण माहिती होईल. तुम्हाला मदत करण्यासाठी आणि स्टॉक बद्दलची माहिती देण्यासाठी ब्रोकर काही fees आकारेल किंवा स्टॉकमधील नफ्याचा हिस्सा घेईल.

  • अधिकृत ब्रोकर (Registered Broker) निवडा. 
  • Demate आणि ट्रेडिंग खाते उघडा. 
  • ब्रोकरमार्फत शेअर्स खरेदी करा.  
  • तुमच्या गुंतवणुकीचे निरीक्षण करा.

भारतात फक्त 2 स्टॉक एक्सचेंज आहेत. NSE आणि दुसरा BSE केवळ यामध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहे त्याच कंपन्यांमधील स्टॉक खरेदी किंवा विकल्या जाऊ शकतात.

Demat Account 

जेव्हा जेव्हा तुम्ही एखादा Share विकत घेता किंवा विकता तेव्हा त्याचे पैसे तुमच्या डिमॅट खात्यात येतात, तुमचे डिमॅट खाते तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असते. आपण आपल्या Demat Account तून आपल्या बँक खात्यावर पैसे सहज पाठवू शकता.

आपणास शेअर मार्केटमध्ये आपले पैसे गुंतवायचे असल्यास आपण FAMOUS Broker “Zerodha” वर आपले खाते तयार करू शकता. यामध्ये तुम्ही Demat Account खूप लवकर आणि सहजपणे उघडू शकता आणि त्यामध्ये शेअरही खरेदी करू शकता.

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग म्हणजे काय?

स्टॉक मार्केटमध्ये “Trading ” हा शब्द खूप लोकप्रिय आहे आणि मोठ्या प्रमाणात वापरला जातो.मराठीमध्ये या शब्दाचा अर्थ “व्यवसाय” आहे. जेव्हा जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेऊन काही काळासाठी आपल्याकडे ठेवतो व जेव्हा त्या वस्तूला किव्हा सेवेला चांगला भाव येतो तेव्हा आपण ती विकून नफा मिळवतो या उद्देशाने एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करतो. तेव्हा त्याला “Trading ” असे म्हटले जाते .

Trading चे प्रकार

बरेच प्रकारचे trading आहेत .परंतु प्रामुख्याने 3 प्रकारचे trading बरेच लोक पसंत करतात आणि वापरतात.

1) Intra-day Trading: एका दिवसात पूर्ण झालेल्या Trades ना Intra-day Trading म्हणतात. इंट्रा-डे ट्रेडिंगमध्ये, त्याच दिवशी Stocks विकत घेऊन त्याच दिवशी त्याची विक्री केली जाते.

2) Scalper Trading: खरेदी केल्याच्या काही मिनिटांतच विकल्या गेलेल्या Tradesना Scalper Trading म्हणतात. यामध्ये शेअर्स 5 ते 10 मिनिटांत खरेदी करून ताबडतोब विकण्यात येतात. या प्रकारच्या स्टॉकचा जास्त नफा होतो. परंतु त्यात गुंतवणूकीची रक्कम जास्त असेल तरच ती फायदेशीर ठरू शकते. नुकसानीची शक्यताही जास्त आहे.

3) Swing Trading: यामध्ये ट्रेडिंगची प्रक्रिया काही दिवस, आठवडे किंवा महिन्यांत पूर्ण केली जाते. स्टॉक खरेदी केल्यानंतर, गुंतवणूकदार आठवड्यात किंवा महिन्यासारख्या काळासाठी ते आपल्याजवळ ठेवतात. यानंतर, स्टॉक ची किंमत वाढण्याची प्रतीक्षा करतात आणि योग्य किंमत आल्यास ते stocks विकून टाकतात आणि नफा कमवतात.

✔Share market ला लोक सट्टा म्हणतात. ज्यामध्ये माणूस फक्त बुडतो परंतु असे मुळीच नाही. ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. जर योग्य पद्धतीने आणि संयम ठेवून गुंतवणूक केली गेली तर ती व्यक्ती यामध्ये बराच नफा कमवू शकते. परंतु त्यामध्ये उडी मारण्यापूर्वी जास्तीत जास्त माहिती मिळविणे फार गरजेचे आहे. मित्रहो  All About Share Market शेअर बाजार संपूर्ण माहीती कशी वाटली ते आम्हास नक्की कळवा.

बुधवार, ४ जून, २०२५

मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business

मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business

   मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business हा एक अभिनव आणि फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय आहे. पूर्वी मोती फक्त समुद्रातून मिळवले जात असत, पण आता गोड्या पाण्यातही मोत्यांची शेती करणे शक्य झाले आहे. पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी याकडे वळत आहेत. भारतासह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business

Sandip Kamble Pearl farming 


मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business कसा करावा ?

* तलावाची निवड: मोत्यांची शेती करण्यासाठी 500 ते 1000 चौरस फुटाचा तलाव आवश्यक असतो. त्याची खोली 5-6 फूट असावी. जर तलाव खोदणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी टाकी बनवूनही मोत्यांची शेती करू शकता.

* शिंपल्यांची खरेदी: मोती तयार करण्यासाठी शिंपले (ओयस्टर) आवश्यक असतात. हे शिंपले बाजारातून किंवा मत्स्यालयातून विकत घेता येतात. एका शिंपल्याची किंमत 15 ते 30 रुपये असू शकते. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगा येथील शिंपले उत्तम मानले जातात.

* शिंपल्यांची तयारी:

* शिंपल्यांना 10-15 दिवस जाळ्यात बांधून तलावात ठेवले जाते, जेणेकरून ते नवीन वातावरणाशी जुळवून घेऊ शकतील.

* त्यानंतर त्यांची शस्त्रक्रिया (सर्जरी) केली जाते. यात शिंपल्याच्या आत एक छोटा कण किंवा बियाणे (न्यूक्लिअर) टाकले जाते. हे कण गणेश, बुद्ध, फुलांच्या आकाराचे किंवा साधे 4-6 मिमी व्यासाचे असू शकतात.

* हा कण टाकल्यानंतर शिंपले नायलॉनच्या पिशव्यांमध्ये (एका पिशवीत 2 शिंपले) ठेवून 10 दिवस अँटीबायोटिक आणि नैसर्गिक खाद्यावर ठेवले जातात. या काळात मृत शिंपले काढून टाकले जातात.

* मोती निर्मिती:

मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business 


* जिवंत राहिलेले शिंपले बांबू किंवा पाईपच्या सहाय्याने नायलॉनच्या पिशव्यांमध्ये तलावात एक मीटर खोलीवर लटकवले जातात.

* शिंपल्याच्या आत टाकलेल्या कणाभोवती शिंपला एक विशिष्ट चमकदार थर (नेकर) जमा करतो. या प्रक्रियेला 14 ते 20 महिने लागतात आणि यातून मोत्याची निर्मिती होते.

* या काळात तलावातील पाणी स्वच्छ ठेवणे आणि नैसर्गिक खाद्य (शेवाळ, जनावरांची विष्ठा) देणे महत्त्वाचे असते.

* मोती काढणे: सुमारे 18 ते 20 महिन्यांनंतर शिंपले फोडून त्यातून मोती काढले जातात. एका शिंपल्यातून 1 ते 2 मोती मिळू शकतात.

मोती शेतीसाठी आवश्यक गोष्टी:

* तलाव किंवा टाकी

* शिंपले (ओयस्टर)

* न्यूक्लिअर (मोती बी)

* नायलॉनच्या पिशव्या, बांबू/पाईप

* शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे

* पाणी व्यवस्थापन आणि नैसर्गिक खाद्य

मोती शेतीतील खर्च आणि नफा:

* खर्च:

* एक शिंपला तयार करण्यासाठी साधारणतः 25 ते 35 रुपये खर्च येतो.

* 500 चौरस फूट तलावात 100 शिंपले टाकून सुरुवात करता येते.

* तलाव खोदण्याचा खर्च एकरकमी असतो, आणि यासाठी सरकारकडून 50% अनुदान मिळू शकते.

* सुरुवातीला 10-12 हजार रुपये स्ट्रक्चर सेट अपवर खर्च येऊ शकतो.

*मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business हा कमी खर्चात भरमसाठ उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.

*विक्री:

मोत्यांची विक्री स्थानिक बाजारपेठेत किंवा ज्वेलरी कंपन्यांना करता येते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही मोत्यांची विक्री करता येते.

* नफा:

* एका मोत्याची किंमत 120 ते 1500 रुपयांपर्यंत असू शकते, मोत्याच्या दर्जावर आणि आकारानुसार ही किंमत बदलते. डिझायनर मोत्यांना चांगली किंमत मिळते.

* जर 1000 शिंपल्यांमधून 600-700 शिंपले जगले तरी 1200-1400 मोती मिळतात, ज्यातून 2-3 लाख रुपये कमवता येऊ शकतात.

* उत्तम नियोजन आणि व्यवस्थापनाने 2 हेक्टर मोती शेतीतून 30 लाख रुपयांपर्यंत नफा कमावल्याची उदाहरणे आहेत.

* मोती काढल्यानंतर शिंपलेही बाजारात विकता येतात, कारण त्यातून सजावटीच्या वस्तू आणि सुगंधी तेल बनवले जाते.

*प्रशिक्षण:

*कोल्हापूर मोती शेती आणि प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर येथे प्रशिक्षण दिले जाते.

*मोती शेतीसाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असते. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर, भुवनेश्वर (ओडिशा) येथे मोत्यांच्या शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. *महाराष्ट्रात मुंबई आणि मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथेही प्रशिक्षण संस्था उपलब्ध आहेत.

*काही खाजगी संस्था आणि शेतकरी गट देखील प्रशिक्षण देतात.महाराष्ट्रात ठरावीक प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत.

*प्रशिक्षणामुळे तुम्हाला शिंपल्यांची निवड, ऑपरेशन, मोत्यांची वाढ आणि काढणी याविषयी सखोल माहिती मिळते.

मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business काही महत्त्वाच्या सूचना:

* मोती शेती सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

* योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय हा व्यवसाय सुरू करू नका.

* पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करा.

* बाजारपेठेचा अभ्यास करून मोत्यांची विक्री करा.

तुम्ही अनेक यशोगाथा आणि प्रात्यक्षिके you tube वर पाहू शकता, ज्यामुळे तुम्हाला अधिक चांगली कल्पना येईल. कोल्हापूरचे संदीप कांबळे तसेच दिगंबर गडम आणि गडचिरोलीचे संजय गंडाटे यांसारख्या शेतकऱ्यांनी मोती शेतीत चांगले यश मिळवले आहे, त्यांचे अनुभव तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. मोती शेती फायदेशीर व्यवसाय Pearl farming profitable business.



धन्यवाद!

सोमवार, २६ मे, २०२५

11th class online admission process


असे करा अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन
असे करा अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन

11th class online admission process 

   11th online admission process 21 मे पासून घोषित करण्यात आली होती, परंतु वेबसाईट क्रॅश झाल्याने प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती, आज 26 मे 2025 पासून पुन्हा नव्याने अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.


  • अर्जासाठी वेबसाईट अन् महाविद्यालयाची निवड

      अर्जदाराला पसंती यादीचा भाग म्हणून किमान एक कनिष्ठ महाविद्यालय आणि जास्तीत जास्त दहा महाविद्यालये निवडावी लागतील. विद्यार्थ्यांना mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येईल आणि इतर योग्य माहिती मिळणार आहे. दिनांक 26/05/2025 पासून 3 जून 2025 सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपले फॉर्म ऑनलाइन करू शकतील. 11th class online admission process 


  • अकरावी ऑनलाइन एडमिशन अर्ज कसा करावा?

     11th class online admission process सर्वप्रथम महाराष्ट्र इयत्ता 11 वी प्रवेश 2025 साठी अधिकृत वेबसाइट https://mahafyjcadmissions.in/ ला भेट द्या.होम स्क्रीनवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.पसंतीचे महाविद्यालय निवडा.सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि विनंती केलेली माहिती भराअधिकृत पोर्टलवर गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयीन वाटपाचा मागोवा घेत राहा.


  • अकरावीचे ऑनलाईन ऍडमिशन अडचण असल्यास येथे संपर्क करा

    जर तुम्हाला प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आली, अथवा फाॅर्म अपलोड झाला नाही किंवा तांत्रिक समस्या आल्या तर त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने 7669100257 किंवा 18003132164 या हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. हे क्रमांक सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत. 11th class online admission process web link 


https://mahafyjcadmissions.in/


शुक्रवार, २४ मे, २०२४

Best Career Options after 12th Arts #12वीं आर्ट्स वालों के लिए बेस्ट करियर

Best Career Options after 12th Arts 12वीं आर्ट्स वालों के लिए बेस्ट करियर

12वीं पास करते-करते सभी स्टूडेंट्स को अपने करियर की चिंता सताने लगती है. कई लोगों को लगता है कि 12वीं साइंस व कॉमर्स से पास करने के बाद स्टूडेंट्स के पास कई ऑप्शन हैं, जबकि Arts वालों के पास लिमिटेड अवसर होते हैं. लेकिन यह धारणा गलत है. मौजूदा दौर में नए कोर्स की डिमांड बढ़ी है. इनमें से कई कोर्स आर्ट्स स्ट्रीम वालों के लिए परफेक्ट माने जाते हैं. जानिए 12वीं आर्ट्स से पास करने के बाद बेस्ट करियर ऑप्शन.(Best Career Options after 12th Arts 12वीं आर्ट्स वालों के लिए बेस्ट करियर)


Law


लॉ कोर्स का विकल्प

इन दिनों कई क्षेत्रों में एआई यानी आर्टिफिशियल इंटेलिजेंस की बढ़त देखी जा रही है. लेकिन लॉ यानी कानून एक ऐसा क्षेत्र है, जिसमें इसका कोई बोलबाला नहीं है. आर्ट्स स्ट्रीम से 12वीं बोर्ड परीक्षा पास करने वाले स्टूडेंट्स एलएलबी कर सकते हैं. आप चाहें तो इस फील्ड में इंटीग्रेटेड कोर्स भी कर सकते हैं. इसमें आपको बीए+एलएलबी की डिग्री दी जाएगी. इसके बाद लाखों की कमाई वाली जॉब्स के लिए आवेदन करना आसान हो जाएगा.




क्रिएटिव फील्ड में है ऑप्शंस

अगर आपकी रुचि डिजाइनिंग या क्रिएटिव फील्ड में है तो आप इवेंट मैनेजमेंट, जर्नलिज्म एंड मास कम्युनिकेशन जैसे फील्ड्स की पढ़ाई कर सकते हैं. जर्नलिज्म का क्षेत्र काफी विस्तृत है. इसमें प्रिंट से लेकर डिजिटल, टीवी, RJ radio, प्रोडक्शन, ग्राफिक डिजाइनिंग, वीडियो एडिटिंग समेत कई क्षेत्रों में आसानी से विविध अवसर मिल जाएंगे. सोशल मीडिया एक उभरता हुआ करियर ऑप्शन है. इसमें कमाई के काफी मौके मिल सकते हैं.(Best Career Options after 12th Arts 12वीं आर्ट्स वालों के लिए बेस्ट करियर)

धन्यवाद 

Jio Platforms IPO भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा IPO आज उघडला. संपूर्ण माहिती

Jio Platforms IPO तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. Reliance च्या Jio Platforms चा...