10वी /12वी नंतर करिअर निवडताना
10वी / 12वी नंतर करिअर कोर्स निवडताना 10वी आणि 12वी नंतरचा वेळ आयुष्यातील महत्त्वाचा असतो. याच वेळी घेतलेला एक निर्णय तुमचे पुढचे career ठरवतो. अनेक विद्यार्थी घाई मधे किंवा इतरांच्या सांगण्यावरून चुकीचा मार्ग निवडतात. आज आपल्याला अशा 5 मोठ्या चुका वाचायला मिळतील त्या तुम्ही अजिबात करू नका. चुक क्रमांक 1: मित्र करतोय म्हणून तोच कोर्स करणे तुमचा मित्र कॉम्प्युटर सायन्स घेतोय म्हणून तुम्हीही तेच घेणे ही सर्वात मोठी चूक आहे. प्रत्येकाची आवड आणि क्षमता वेगळी असते. त्याला कोडिंग आवडते म्हणून तुम्हाला आवडेलच असे नाही. काय करावे? स्वतःला विचारा - मला दिवसभर काय करायला आवडेल? माझा छंद काय आहे? त्यावरून करिअर निवडा. चूक क्रमांक 2: फक्त पॅकेज बघून करिअर निवडणे "AI मध्ये 20 लाख पॅकेज आहे" हे ऐकून अनेकजण तिकडे धावतात, पण त्या क्षेत्रात मेहनत किती आहे हे बघत नाहीत. जास्त पगाराच्या मागे धावताना जर आवड नसेल तर तुम्ही 2 वर्षात कंटाळून जाल. काय करावे? पगारासोबतच त्या क्षेत्रात 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला बघता का? याचा विचार करा. चूक क्रमांक 3: नातेवाईक आणि समाजाच्या दबावाखाली येणे "शेज...